Daksh Police Times
Wakad : Daksh Police Times आठ वर्षाच्या लहान मुलाचे अपहरण करुन निर्गुण हत्या
Monday, 26 Feb 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

Daksh Police Times :पोलीस स्टेशन - वाकड

प्रेस नोट ता. २६/०२/२०२४ आठ वर्षाच्या लहान मुलाचे अपहरण करुन निर्चुन खुन करणाऱ्या नराधारामाला ठोकल्या वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी.

00 दि.२४/०२/२०२४ रोजी फिर्यादी नामे राधेशाम रायसिंग बरडे, वय ३३ वर्षे, रा. रोहित कलाटे चाळ, पिंकसिटी सोसायटी समोर, पिंकसिटी रोड, वाकड, पुणे यांचा ०८ वर्षे वयाचा मुलगा यास सायंकाळी ०६:०० वा. ते रात्री ०८:०० वा. चे दरम्यान राहते घराजवळ रोहित कलाटे चाळ, पिंपसिटी रोड, वाकड, पुणे येथे खेळत असताना कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले म्हणून वाकड पोलीस ठाणे येथे दिनांक २५/०२/२०२४ रोजी ०२:०० वा. चे सुमा सुमारास चाकड पोलीस ठाणे येथे खबर प्राप्त होताच फिर्यादी यांचे तक्रारीवरुन वाकड पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २२७/२०२४ भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरचा गुन्हा अंत्यत गंभीर स्वरुपाचा असल्याने मा. सहायक पोलीस आयुक्त, श्री. डॉ. विशाल हिरे, बाकड विभाग, प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक, श्री. विठ्ठल साळुंखे यांनी वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाच्या टिम तयार करुन त्यांना मार्गदर्शन व सुचना देवुन गुन्हा उघड करुन अपहृत मुलाचा शोध घेऊन आरोपीस तात्काळ अटक करणेकामी आदेशित केले.

सदर घटनेची गांभीर्य ओळखुन तपास पथकाचे पोउपनि. सचिन चव्हाण व पोउपनि. अनिरुध्द सावर्ड यांच्या दोन टिम तयार करुन गुन्हा घडले ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता अपहृत मुलास एक संशयीत व्यक्ती घेऊन जात असताना दिसून आला. त्या आधारे तपास पथकाने संशयीत इसम पवन जागेश्वरप्रसाद पांडे, वय २८ वर्षे, रा. गाव नागर, थाना माणिकपुर, जि. चित्रकुट, राज्य उत्तरप्रदेश याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याचेकडे अपहरण झालेल्या मुलाबाबत चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर सदर इसमाकडे सखोल चौकशी केली असता त्याने अपहरण केलेल्या मुलासोबत अनैसर्गिक संभोग करुन त्याचा खुन करुन त्याचा मृतदेह बावधन येथे टाकला असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मृतदेह मिळून आला असून सदरचा मृतदेह शवविच्छेदना करिता वाय.सी.एम. हॉस्पीटल, पुणे येथे पाठविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी पवन जागेश्वरप्रसाद पांडे, वय २८ वर्षे, रा. गाव नागर, थाना माणिकपुर, जि. चित्रकुट, राज्य उत्तरप्रदेश यास दिनांक २५/०२/२०२४ रोजी २१:०० वा. अटक करण्यात आली असून दाखल गुन्ह्यात भादंवि कलम ३०२,३६४,३६५,३६७,३६८,३७७,२०१ सह पोक्सो कायदा कलम ४,६,८,१०,१२ प्रमाणे कलमवाढ करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे.

सदरची कारवाई मा. श्री. विनयकुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. बापु बांगर साो, पोलीस उप आयुक्त, परि-२ पिंपरी चिंचवड, मा. श्री. डॉ. विशाल हिरे, सहा. पोलीस आयुक्त साो, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, श्री. विठ्ठल साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. रविकिरण नाळे, सपोनि. निलेश नलावडे, पोउपनि सचिन चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे, श्रेणीपोउपनि बिभीषण कन्हेरकर, श्रेणीपोउपनि बाबाजान इनामदार, सपोफौ, राजेंद्र काळे, पोहवा. संदीप गवारी, याहवा. बंदु गिरे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. विनायक म्हसकर, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोहवा. अतिक शेख, पोहवा. विक्रांत चव्हाण, पोहवा. हनमंत कुंभार, पोना. प्रशांत गिलबीले, पोना. रामचंद्र तळपे, पोशि. भाकर भारती, पोशि. अजय फल्ले, पोशि. कौतेंय खराडे, पोशि. लामतुरे, पोशि. स्वप्निल लोखंडे, पोशि रमेश खेडकर, पोशि. ज्ञानदेव झेंडे, पोशि.सागर पंडीत (परि-०२ कार्यालय) यांनी केली आहे.

(बापु बांगर)

पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, पिंपरी चिंचवड

Daksh Police Times