Daksh Police Times
Pune : Daksh Police Times १९/०२/२०२४ रोजी श्री. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदलाबाबत
Saturday, 17 Feb 2024 18:00 pm
Daksh Police Times

Daksh Police Times

सोमवार, दिनांक- १९/०२/२०२४ रोजी, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमीत्त शहरातील मध्यवर्ती भागातील लक्ष्मीरोड, शिवाजीरोडवरुन मिरवणूका निघत असतात. तसेच नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील प्रामुख्याने बाजीराव रोड, कुमठेकर रोड, केळकर रोड व इतर रोडवर वाहतूक वाढून सदर रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक संथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी वाहतुक सुरक्षीत व सुरळीत राहणेकरीता सदर परिसरातील वाहतूकीत बदल करणे आवश्यक आहे. यास्तव महाराष्ट्र शासन गृह विभाग क्र.एम.व्ही.ए.०१९६/८७१/सीआर-३७/टिआरए-२, दिनांक- २७/०९/१९९६ चे नोटीफीकेशन नुसार मोटार वाहन कायदा कलम ११५,११६(१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन मी, शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, वाहतुक पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, रुग्णवाहिका इ.) खेरीज करुन आवश्यकतेनुसार व तेथील वाहतुकीच्या परिस्थितीनुसार वाहतुक व्यवस्थेमध्ये दिनांक १९/०२/२०२४ रोजी सकाळी ०७.०० वा. पासून गर्दीसंपेपर्यंत नेहरु रोड, लक्ष्मी रोड, शिवाजी रोड, बाजीराव रोडवरील सर्व प्रकारच्या वाहतूकीत खालीलप्रमाणे बदल करीत आहे. पर्यायी मार्ग-

१) जिजामाता चौक येथुन शिवाजी रोड वरुन स्वारगेटला जाणारे वाहन चालकांसाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक टिळक चौक टिळक रोडने इच्छितस्थळी जातील.

२) गणेश रोड - दारुवाला पुलाकडुन फडके हौद चौक, जिजामाता चौकाकडे येणारी वाहतुक ही

दारुवाला पुल चौकातुन इच्छितस्थळी जातील. ३) केळकर रोडने अप्पा बळवंत चौकातून जोगेश्वरी मंदीर चौक मार्गे बुधवार चौकाकडे येणारी वाहतुक

आवश्यकते नुसार वळविण्यात येईल. ४) मिरवणुक लक्ष्मी रोडवर असताना सोन्या मारुती चौक पास होईपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रोड

वरील वाहने संतकबीर चौक समर्थ विभाग हद्दीतुन वळविण्यात येईल. ५) पुरम चौकातुन बाजीराव रोडवरुन शिवाजीनगरकडे जाणा-या वाहन चालकांसाठी पुरम चौकातून

टिळक रोडने अलका टॉकीज चौक व पुढे एफ. सी. रोडने इच्छितस्थळी जातील.

६) मिरवणुका सुरू झाल्यानंतर आप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे व बाजीराव रोडने फुटका बुरुजकडे न जाता सर्व वाहने केळकर रोडने सरळ पुढे इच्छितस्थळी जातील.

७) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होऊन जाणार नाहीत तोपर्यंत सर्व वाहने सावरकर भवन पुलावरुन बालगंधर्व बाजुकडे किंवा टकले हवेली चौकामार्गे इच्छितस्थळी जातील.

८) मिरवणुका गाडगीळ पुतळा पास होईपर्यंत वाहने शनिवार वाड्याकडे न जाता ती कॉसमॉस बैंक जंक्शन, सावरकर भवन पुल ते बालगंधर्व, टिळक पुलमार्गे मनपाकडे किंवा टकले हवेली मार्गे इच्छितस्थळी जातील.

९) स. गो. बर्वे चौकातुन पुणे मनपा भवनकडे जाणारे वाहन चालकांनी स. गो. बर्वे चौकातुन जंगली महाराज रोडने झाशी राणी चौक डावीकडे वळुन इच्छित स्थळी जातील.

 

Daksh Police News