Daksh Police Times
चांदवड : दक्ष पोलिस टाइम्स चांदवड येथील प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक यांची हत्या
Wednesday, 17 Jan 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

चांदवड तालुक्यातील दुगाव येथील प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक राजूभाऊ केदु शिंदे यांची संत जनार्दन संकुल दुगाव येथे  पूर्ववैमनस्यातून जुन्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ करत धारदार शस्त्राने पियुष सतीश सुतार याने छातीच्या डाव्या बाजूस गंभीर जखम करत व राज चंचल क्षीरसागर येणे हातातील चाकूने डोक्यावर मध्यभागी मारून गंभीर दुखापत केल्याने राजू शिंदे यांची हत्या केली ची घटना मयताची पत्नी शितल राजू शिंदे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिल्याने दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात चंचल भानुदास क्षीरसागर , विनोद भानुदास क्षीरसागर राग चंचल क्षीरसागर पियुष सतीश सुतार यांच्यासह इतर सहा जणांवर भादवी कलम 302, 324 ,323 ,504 ,506 ,147, 143, 148, 149 महाराष्ट्र पोलीस कलम 135 प्रमाणे गुन्हा नोंद देण्यात आला आहे सदर घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी व चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक भानुदास नरे व पोलीस हवालदार आरे ऐ चौधरी करीत आहे.