Daksh Police Times
पिंपरी : दक्ष पोलिस टाइम्स रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड पोलिसांकडून अटक, तीन रिक्षा जप्त
Friday, 05 Jan 2024 00:00 am
Daksh Police Times

Daksh Police Times

पुणे : सिंहगड रोड परिसरातून रिक्षा चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून दोन लाख 55 हजार रुपये किमतीच्या तीन रिक्षा जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई 31 डिसेंबर रोजी रात्री साडे बाराच्या सुमारास प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोडवर करण्यात आली. विशाल युवराज राऊत (वय-19 रा. मु.पो. अंतोली ता. वेल्हा, जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव बुद्रुक येथील केंदार अपार्टमेंट मध्ये पार्किंग केलेली अॅटोरिक्षा चोरीला गेली होती. ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली होती. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अंमलदार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दाखल गुन्ह्याचा तपास करत होते. दरम्यान, 31 डिसेंबर रोजी तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना सहायक पोलीस उपनिरीक्षक आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांना माहिती मिळाली की, एक तरुण प्रयोजा सिटी समोरील सर्व्हिस रोडवर काळी-पिवळी रिक्षा घेऊन त्यामध्ये बसला आहे. ही रिक्षा चोरीची असल्याची माहिती मिळाली. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

तपास पथक त्याठिकाणी गेले असताना एक जण रिक्षा घेऊन जाण्याच्या तयारी असताना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्याच्याकडे असलेल्या रिक्षाबाबत चौकशी केली. मात्र त्याने काहीच माहिती दिली नाही.रिक्षा चोरीची असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीला अटक करुन रिक्षा जप्त केली.त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने कात्रज चौक, सर्प उद्यान कात्रज येथून रिक्षा चोरी केल्याचे सांगितले.त्याच्याकडून 2 लाख 55 हजार रुपयांच्या तीन रिक्षा जप्त करुन सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील एक आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील दोन असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.ही कामगिरी पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 संभाजी कदम,सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखालीसहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशीपोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राजु वेगरे, राहुल ओलेकर, सागर शेडगे,अमोल पाटील, शिवाजी क्षीरसागर, देवा चव्हाण, विकास पांडुळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील,स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली.